Wednesday, February 5, 2025

तहसिल, नगरपंचायत, पोलिसांच्या संयुक्त पथकाला विनामास्क फिरताना व्यक्ती आढळल्यास दंड वसुलीचे व गुन्हा दाखल अधिकार

सुरगाणा (दौलत चौधरी) : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ‘ॲक्शन मोड’मध्ये आली असताना आता जोडीला पोलिसांनादेखील आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. 

त्यानुसार पोलिस मैदानात उतरले असून, तहसिल नगरपंचायत पोलिसांच्या संयुक्त पथकाला विनामास्क फिरताना व्यक्ती आढळल्यास दंड वसुलीचे अधिकार व गुन्हा दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पथकांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. 

शहरातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना पोलीस ग्राउंड या ठिकाणी जागा करण्यात आली असताना नागरिकांकडून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवावा, अशी जनजागृती नगरंचायत व नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आली.  

कोरोनावाढीचा वेग झपाटय़ाने वाढ असल्याने  नगरपंचायत प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. बाजारपेठा, शासकीय कार्यालये, किराणा दुकानदार, फळविक्रेते, भाजी विक्रेते, औषध विक्रेते, हातगाडीवरील विक्रेते, मास्क घालत नसल्याचे आढळल्याने मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोण्यासाठी जनजागृती करत असताना मुख्याधिकरी डॉ. सचिन कुमार पटेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गटनेते राजू शेख, शिवसेना गटनते भारत वाघमारे, नगर पंचायत कर्मचारी जगदीश पिठे, अजित शेख, विजय गोयल हे उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles