माहूर तहसिल समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
माहूर, दि. २३ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या बी.ए, बी.काॅम, बी.एस.सी च्या उन्हाळी परीक्षा २०२१ या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने या निर्णयाने माहूर सारख्या डोंगराळ भागातील खेडे ,तंडे सारख्या गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा मोठा फटका बसणार आहे. ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांन कडे आजही चांगले अँड्राईड मोबाईल नाहीत. तर अनेक गावात मोबाईल टावर नाहीत. त्यामुळे अनेक गावात नेटवर्क ही येत नसल्याने ग्रामीण भागात इंटरनेट सेवा चालत नाही. सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सतत पाऊस चालू राहतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडीत केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल चार्जिंग करण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी येतात. आणि त्याचा परीणाम परीक्षे वर होऊ शकतो. आणि ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुसकसान होऊ शकते. यामुळे नांदेड विद्यापीठाच्या परीक्षा या ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घ्या. या मागणी साठी एसएफआय माहूर तालुका कमिटीच्या वतीने दि. २२ जून रोजी माहूर तहसिल कार्यालया समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून उच्चशिक्षण मंत्री व कुलगुरू यांनी ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही परीक्षा पद्धतीला परवानगी देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावे.अशी मागणी घेऊन एसएफआय चे जिल्हा सचिव प्रफुल कउडकर, माहूर तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे, अभिषेक खंदारे, महेश कांबळे, तुषार कांबळे यांनी माहूर तहसिल कार्यालया समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले होते.
सायंकाळी ५ वाजता माहूर तहसिलचे नायब तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपली मागणी पुढील कार्यवाहीस्तव जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठवण्यात आली आहे. तरी आपण उपोषणा पासून माघार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे लेखी पत्र दिल्यावर या उपोषणा पांसुन माघार घेण्यात आले. जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास थेट विद्यापीठा समोरच आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.