Wednesday, February 5, 2025

आधार संस्थेच्या वतीने टॅब, शैक्षणिक साहित्य वितरण व वृक्षारोपण संपन्न !

मावळ : रविवार, दि ८ आॅगस्ट २०२१ रोजी आधार शैक्षणिक संस्था पुणे व रोटरी क्लब ऑफ पिंपरी ईलाईट यांच्या सहकार्याने कै उषाताई लोखंडे चॅरिटेबल ट्रस्ट पुणे संचलित माध्यमिक विद्यालय, मौजे सांगिसे, ता. मावळ, जि. पुणे या विद्यालयातील दोन गरजू मुलींना शिक्षणासाठी १ टॅब व वह्या, पुस्तक व शैक्षणिक साहित्य मोफत व वितरीत करण्यात आले.

यावेळी आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, संस्थापक किशोर थोरात, अरूण काशीद, विदयाताई काशीद, सुरज फलके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आकांक्षा व अंकिता राम या भगिनींना टॅबचे अनावरण करून साहित्य वितरीत करण्यात आले.

स्वागत शिक्षक व प्रभारी अंबादास गर्जे यांनी केले.तसेच यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही संस्थेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळुकाका गरूड, प्रसाद गरूड, भाऊ निंबाळकर, संतोष कदम इ. ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी  शिक्षक दिपक गागरे, शिक्षिका श्रीमती सविता शिंदे हे उपस्थित होते. 

ग्रामीण, दुर्गम व डोंगरी भागातील या शाळेतील गरजू मुलींना हे साहित्य उपलब्ध झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळून प्रगतीचा नवा मार्ग या सहकार्याने मिळणार आहे. त्याबद्दल आधार संस्थेचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles