चांदवड (सुनिल सोनवणे) : आज चांदवड येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या नेतृत्वाखाली चांदवड शहरातील सर्व ओ.बी.सी समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवण्या करिता आवश्यक ईम्पिरिकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व केंद्र/राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करावा.
या मागणीसाठी महाराष्ट्र तैलिक महासभेच्या नेतृत्वात चांदवड शहर ओबीसी संघटना व शहरातील सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज (ता. २ जुलै) प्रांतकार्यालय चांदवड येथे लाक्षनिक धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक बारवकर चांदवड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रांतिक कार्याध्यक्ष व ओबीसी नेते अशोक व्यवहारे ओबीसी संघटना अध्यक्ष विजय सांबर, जगन राऊत, विनोद सोनवणे, सचिन खैरनार, दिपक व्यवहारे, बाळासाहेब कबाडे, परदेशी तात्या, अल्ताफ तांबोळी, संजय क्षत्रीय, युवा अध्यक्ष संकेत राऊत, सुरेश बिल्लाडे, दत्तू सोनवणे, संतोष सुतारे यांसह इतर स्त्रीया व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.