Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Alandi : कुरुळी प्राथमिक शाळेत मेंदूज्वर लसीकरण

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील कुरुळी प्राथमिक आरोग्य केंद्र करंज विहिरेअंतर्गत उपकेंद्र च्या वतीने पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा येथे जपानी इंसेफलाईटीस (मेंदूज्वर)लसीचे लसीकरण करण्यात आले. (Alandi)

पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या उपक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र करंजविहिरे कार्यक्षेत्रातील १२ आरोग्य उपकेंद्र अंतर्गत ३४ गावांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन यांनी दिली. (Alandi)

या आजारापासून संरक्षण करण्याकरिता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. यात वेरी वर्षे एक ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व बालकांनी हे लसीकरण करून घ्यावे असे आव्हान आरोग्य निरीक्षक संतोष फडके यांनी केले आहे. एक ते पंधरा वर्षे पर्यंतच्या ३७ हजार ४६३ मुलांना लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र करंज विहिरे मार्फत करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे उदघाटन कुरुळी ग्रामपंचायत सरपंच अनिता बधाले यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपक्रमास शुभेच्छा देत संवाद साधला. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र करंजविहिरेचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता गाढवे, डॉ. प्रज्ञा खताळ, आरोग्य निरीक्षक राजेश चांदणे, आरोग्य सहायिका सविता टेकवडे, विजया टेमगिरे, उपकेंद्र कुरुळीचे आरोग्यसेवक हरिदास टेकवडे, रूपाली जाधव आरोग्यसेविका, आशाताई मुऱ्हे, सुषमा कांबळे, आरती कांबळे, जयश्री गोसावी, सोनल मुऱ्हे, शितल मुऱ्हे, परिचर ज्योती बेल्हेकर, उपकेंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सुनिल वाव्हळ यांनी केले. हरीदास टेकवडे यांनी आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापिका व त्यांच्या सर्व शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतलेले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles