Home News निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

Suspended police inspector Rajesh Khandve arrested

गडचिरोली : गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान 20 एप्रिलच्या पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात गण्यारपवार यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्याय दंडधिकारी एन. डी. मेश्राम यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश 20 मे रोजी दिले होते. या आदेशानंतर संतप्त झालेले पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी 25 मे रोजी सकाळी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करत हुज्जत घातली.

याप्रकरणी न्यायाधीशांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांना अवगत केल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर चामोर्शी पोलिसांनी राजेश खांडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी राजेश खांडवे यांना निलंबित करण्यात आले. नंतर खांडवे हे नागपूरला दवाखान्यात भरती होते. शुक्रवारी ते गडचिरोलीला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 हे ही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

Exit mobile version