रत्नागिरी : सुशिलकुमार पावरा यांची बिरसा क्रांती दलाच्या युवा राज्याध्यपदी निवड करण्यात आली आहे. दशरथ मडावी संस्थापक अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. या सभेत सुशिलकुमार पावरा यांची बिरसा क्रांती दलाच्या युवा राज्याध्यक्ष पदी निवड करीत असल्याचे दशरथ मडावी यांनी जाहीर केले.
यावेळी मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख व अध्यक्ष, राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष सांगली, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे, चिंधू आढळ पुणे संघटक, रोहीत पावरा जिल्हाध्यक्ष नंदुरबार, दादाजी बागूल तालुका अध्यक्ष बागलाण, मधूकर पाडवी तालुका अध्यक्ष पेठ, नंदलाल पाडवी तालुका अध्यक्ष साक्री, राकेश वळवी तालुका अध्यक्ष नवापूर, चेतन बांगारे जिल्हा अध्यक्ष ठाणे, मनोज जांभोरे जिल्हा अध्यक्ष रायगड इत्यादी पदाधिकारी व अनेक सदस्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
सुशिलकुमार पावरा हे कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष बिरसा क्रांती दल पदावर कार्यरत होते. त्यांनी आपली कामगिरी राज्यभर गाजवली होती. सुशिलकुमार पावरा यांचा राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संपर्क व संघटनेतील कामगिरी बघून पावरा समर्थकांनी दशरथ मडावी यांच्या कडे राज्य पदासाठी मागणी केली होती. अनेक विभागातून मागणी जोर धरू लागली होती. समर्थकांची मागणी लक्षात घेऊन दशरथ मडावी यांनी सुशिलकुमार पावरा यांना बिरसा क्रांती दल महाराष्ट्राची धूरा सोपवली.
सुशिलकुमार पावरा यांना नुकताच International idol award 2021( आंतरराष्ट्रीय मूर्ती पुरस्कार 2021) मिळाला आहे. राष्ट्रीय कला मित्र पुरस्कार, आदिवासी रत्न, महाराष्ट्र रत्न, समाजभूषण इत्यादी विविध पुरस्कार मिळाले आहेत. सुशीलकुमार पावरा यांची 135 वेळा उपोषण करणारे उपोषण कर्ता, शिक्षक, गायक, नृत्यक, कराटेपटू, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ता, कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल म्हणूनही विशेष ओळख आहे.
सुशीलकुमार पावरा हे नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात व निस्वार्थपणे सामाजिक कार्य करत असतात. सामाजिक कार्यात त्यांच्यावर अनेक कठीण प्रसंग आलेत.तरीही कुठेही न डगमगता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांच्या सामाजिक कामाला लोक अधिक पसंत करतात. आदिवासी समाजाचे एक दमदार नेतृत्व म्हणून सुशीलकुमार पावरा यांना आदिवासी बांधव पसंत करत आहेत.