Friday, March 29, 2024
Homeजिल्हातौक्ते चक्रीवादळ : महावितरण व तहसील कार्यालयास आ. निकोले यांची भेट

तौक्ते चक्रीवादळ : महावितरण व तहसील कार्यालयास आ. निकोले यांची भेट

वीज पुरवठा पूर्वव्रत व संपूर्ण पंचनामे करू, प्रशासनाची ग्वाही

डहाणू : तौक्ते चक्रीवादळामुळे डहाणू व तलासरी भागात अतोनात नुकसान झाले असून अनेक भागात अध्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नसल्याने महावितरण कार्यालयास भेट देऊन आढावा घेत तद्नंतर डहाणू तहसील कार्यालयात संपूर्ण परिस्थिती चा आढावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी प्रत्यक्ष घेतला आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील १२८ डहाणू (अ.ज) विधानसभा क्षेत्रात डहाणू व तलासरी हे दोन तालुके येत असून हा आदिवासी बहुल भाग आहे. या परिसरातील अनेक ग्रामीण भाग, अति दुर्गम भाग तसेच अनेक आदिवासी पाडे यांमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरण चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने आमच्या शिष्टमंडळा सहीत आम्ही महावितरण कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व कनिष्ठा अभियंता यांच्या कडून वस्तूस्थितीचा आढावा घेतला. त्यावर पडलेले विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मेर, तुटलेल्या तारा यांची दुरुस्ती करावी व खंडित झालेला वीज पूर्वव्रत करावा आदी सूचना केल्या असता येत्या ४ – ५ दिवसांमध्ये सर्व विभागामध्ये पूर्वी प्रमाणे वीज पुरवठा पूर्वव्रत करण्यात येईल अशी ग्वाही महावितरण डहाणू उप कार्यकारी अभियंता धोडी यांनी दिली. तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे डहाणू किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेत जमिनीचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात चिक्कू बाग, भात शेती, इतर फळ बागा यांच्या सह अनेक घरांचे नुकसान झाले आहे. यावर डहाणू तहसील कार्यालय येथे तहसीलदार राहुल सारंग, गट विकास अधिकारी यांच्या सहीत कृषी अधिकारी व विभागातील सर्व सर्कल अधिकारी यांच्या सोबत आढावा घेऊन मतदार संघात झालेल्या नुकसानाबद्दल चा अहवाल घेतला. त्यावर संपूर्ण पंचनामे लवकरत लवकर तयार करून त्यात एकही शेतकरी किंवा तौक्ते चक्रीवादळ ग्रस्त वंचित राहिला नको अशी सूचना आमदार निकोले यांनी दिली असता तहसीलदार सारंग म्हणाले की, एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि लवकरत लवकर पंचनामे पूर्ण करू अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी महावितरण कार्यालयात व तहसील कार्यालयात माकप आमदार कॉमेड विनोद निकोले, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकात गोरखाना, डॉ.आदित्य अहिरे, डहाणू शहर सचिव धनेश अक्रे यांच्यासह महावितरण डहाणू उप कार्यकारी अभियंता धोडी, कनिष्ठा अभियंते, तहसीलदार राहुल सारंग, कृषी अधिकारी व सर्व सर्कल अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय