Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आपल्या ‘गुलीगत धोका’ या डायलॉगने सर्वांना हसवणारा सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याचा नुकताच एक चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. मात्र यावेळी तो वादाच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या पहिल्या चित्रपट ‘राजा राणी’वर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असून, चित्रपट समाजासाठी घातक असून यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतकंच नाही तर, हा चित्रपट बंद करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. प्रसिद्ध वकील वाजिद खान यांनी चित्रपटावर तातडीने बंदी न घालल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
‘राजा राणी’ हा चित्रपट कथानकामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या शेवटी समाज व नातेवाईकांमुळे दोन प्रेमी एकत्र होवू शकत नाहीत, म्हणून चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करतात. यातून चुकीचा संदेश देण्यात आल्याचा आरोप देखील वाजिद खान यांनी केला आहे. वाजिद खान यांच्या मते, हा चित्रपट पाहून अनेक तरुण तरुणींना चुकीचा संदेश मिळू शकतो आणि त्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी, अशी त्यांची मागणी आहे.
सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीतील यशानंतर महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. त्यामुळे ‘राजा राणी’ चित्रपटातील घटनांचे अनुकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वाजिद खान यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
‘राजा राणी’ चित्रपटात रोहन पाटील, वैष्णवी शिंदे आणि सूरज चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून, कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन आणि निर्मिती गोवर्धन दोलताडे यांची आहे. ‘थोडासा भाव देना’ हे गाणं विशेष लोकप्रिय ठरले असून, चित्रपटातील रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना भावला आहे.
तर या गाण्यात आपल्या मित्राला प्रेमामध्ये पाठिंबा देताना ‘बिग बॉस’ फेम सूरज चव्हाण आणि सैराट फेम तानाजी गलगुंडे दिसत आहे.मात्र, आता या चित्रपटावर बंदीची मागणी केली जात आहे.
मात्र, या सगळ्यामुळे सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
Suraj Chavan
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
सलमान खानला मारण्याचा कट उघड ;धक्कादायक माहिती समोर
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती