Monday, March 31, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची अंतराळातून यशस्वी पृथ्वीवर पुनरागमन

वॉशिंगटन : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams)
आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर, निक हेग आणि अलेक्झेंडर गोरबुनोव यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पृथ्वीवर यशस्वीपणे परत येण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. NASA आणि SpaceX च्या क्रू-9 मिशन अंतर्गत या चार अंतराळवीरांनी भारतीय वेळेनुसार बुधवार, ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग केली.

---Advertisement---

Sunita Williams यांचा ९ महिन्यांचा संघर्षमय प्रवास

सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर यांनी ५ जून २०२४ रोजी बोइंग स्टारलाइनर अंतराळ यानावर चढून आपले अंतराळ प्रवास सुरू केले होते. हा प्रवास सुरुवातीला ८ दिवसांचा असणार होता. मात्र, यानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना तब्बल ९ महिने ISS वर अडकून राहावे लागले. अखेर, दीर्घ प्रतीक्षेनंतर दोघेही सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.

स्पेसएक्स ड्रॅगन यानाद्वारे पुनरागमन

निक हेग आणि अलेक्झेंडर गोरबुनोव हे २९ सप्टेंबर २०२४ रोजी अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. त्यांनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन फ्रीडम यानावरून उड्डाण केले होते. हे यान सप्टेंबरपासून ISS ला डॉक होते. याच यानाने क्रू-9 ला पृथ्वीवर परत आणले. स्प्लॅशडाउननंतर चालक दलाने ड्रॅगन यान आणि अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी सुमारे एक तास खर्च केला.

---Advertisement---

बोइंग स्टारलाइनर: संघर्षाची कहाणी

NASA ने ऑक्टोबर २०११ मध्ये बोइंगला अंतराळ यान तयार करण्यासाठी मंजुरी दिली होती. हे यान तयार होण्यासाठी तब्बल ६ वर्षे लागली. २०१७ मध्ये यान तयार झाले, मात्र २०१९ पर्यंत मानवरहित चाचण्या सुरू होत्या. यानात वारंवार तांत्रिक बिघाड झाल्याने मानवासह यानाचे पहिले यशस्वी मिशन तब्बल २०२४ मध्ये झाले.

अंतराळ संशोधनातील मोलाची कामगिरी

सुनीता विल्यम्स यांचा हा प्रवास अंतराळ संशोधनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यामध्ये बोइंगच्या यानातील समस्या, अंतराळवीरांची धैर्यशीलता आणि नासाच्या कार्यक्षमतेची परीक्षा घेण्यात आली. यशस्वी लँडिंगनंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जगभरातून अभिनंदन केले जात आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles