Wednesday, February 5, 2025

आशाना 1500 रुपये व गटप्रवर्तकना 1700 रुपये मानधन वाढ हे संपाचे यश – आनंदी अवघडे

सातारा आशाना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

जाणून घ्या ! केळी खाण्याचे फायदे व तोटे

राज्य आशा व गटप्रवर्तक समन्वय समिती व सिटूच्या नेतृत्त्वाखाली आशा व गटप्रवर्तक यांच्या न्याय मागण्यासाठी 15 ते 23 जून 2021 कालावधीत बेमुदत काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य सरकारने आशा व गटप्रवर्तक यांना 1500 रुपये व 1700 रुपये मानधन वाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण त्याबाबतचा शासन आदेश केला नसल्याने पुन्हा आंदोलन करण्यात आले होते. आजच्या शासन निर्णयामुळे सिटूच्या लढ्याला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्मा राज्य अध्यक्षा आनंदी अवघडे यांनी व्यक्त केली. 

वाचा सविस्तर ! केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ?

तसेच कोरोना महामारी सुरु असेपर्यंत आशा व गटप्रर्वतक यांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित वाढ जुलै 2021 या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणाऱ्या अंदाजे 135 कोटी 60 लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली. हे मानधन वाढ, आशा व गटप्रवर्तकांच्या संपाचे यश असल्याचे अवघडे म्हणाल्या.

अनोखे आंदोलन ! ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ आंदोलनाला राज्यात सुरुवात

Related Articles

- Advertisement -

Latest Articles