Thursday, April 25, 2024
Homeग्रामीणजुन्नर : किसान सभेला सोबत घेऊन निमगिरी ग्रामस्थांनी केली ग्राम प्रशासनाकडे रोजगाराची...

जुन्नर : किसान सभेला सोबत घेऊन निमगिरी ग्रामस्थांनी केली ग्राम प्रशासनाकडे रोजगाराची मागणी

जुन्नर : किसान सभेला सोबत घेऊन निमगिरी ग्रामस्थांनी ग्राम प्रशासनाकडे रोजगाराची मागणी केली.

ग्रामीण अर्थकारणाला गती देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा चालू केला. मात्र नेहमीप्रमाणे प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवून रोजगार हमी ची योजना निष्फळ करण्याची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील, असे किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले. 

हे पण वाचा ! जुन्नर : भरवस्तीत धारदार शस्राने वार करत वृद्ध दाम्पत्याला लुटले

मात्र ग्रामीण जीवनाची आर्थिक उन्नती होण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुणे जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा  दोन वर्षापासून रोजगार हमीच्या कामांना केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे. वास्तविक कोरोनाच्या भीषण महामारी मुळे ग्रामीण  समाज जीवन हायास आले आहे. अनेक तरुणांचे हात हे बेरोजगार झालेले आहेत या बेरोजगार हातांना काम देण्याची गरज ओळखून किसान सभेने गावोगावी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले.

या रोजगार मेळाव्यांना मजुरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। विशेषतः ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेला महिलावर्ग, तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. 

याचाच एक भाग म्हणून 18 ऑगस्ट 2021 रोजी अखिल भारतीय किसान सभा आणि पंचायत समिती, कृषी विभाग प्रशासनाकडून खटकाळे गावांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देवळे, हिरडी, खटकाळे, निमगिरी, केवाडी, या गावांमधील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अनेक ग्रामस्थांनी आम्हाला गावांमध्येच रोजगार उपलब्ध व्हावा अशी मागणी या मेळाव्यामध्ये मांडली होती.

या सर्व मजुरांची मागणी केंद्रस्थानी मानून किसान सभेचे लक्ष्मण जोशी यांनी या मागणीचा कसोशिने पाठपुरावा चालू केला त्याचेच फलित म्हणून दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी निमगिरी गावातील 65 बेरोजगार ग्रामस्थांनी ग्रामप्रशासनाकडे रोजगार हमीचे अर्ज भरून दिले आणि आम्हाला गावातच रोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारची मागणी  करण्यात आली. 

काय आहे आंदोलन पहा ! ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ आंदोलनाला राज्यात सुरुवात

यावेळी अनेकांकडे जॉब कार्ड उपलब्ध नसल्यामुळे अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाली. मात्र गावचे सरपंच सुमन दादाभाऊ साबळे, उपसरपंच तानाजी असवले, तसेच पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी मजुरांच्या मागणीला प्राधान्य देऊन ग्रामप्रशासनाला या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश साबळे, संजय साबळे, गीता रढे आधी सर्वांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन ग्रामस्थांच्या रोजगार मागणीचे अर्ज भरून घेण्याबाबतचा निर्णय घेतला जावा अशी ठाम भूमिका घेतली आणि सर्वांना रोजगार उपलब्ध करून देऊ अशाप्रकारे आश्वासित केले. यावेळी 65 ग्रामस्थांनी रोजगार मिळण्याबाबत मागणी अर्जाद्वारे ग्रामसेवक दिघे भाऊसाहेब यांच्याकडे केली.

मोठी बातमीसिटूच्या लढ्याला यश ! आशाना 1500 रुपये व गटप्रवर्तकना 1700 रुपये मानधन वाढ !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय