Wednesday, April 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

मुंबई / आनंद कांबळे : विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन दरमहा 18 हजार रुपये करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता विद्यार्थ्यांना भरीव विद्यावेतन मिळावे, यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आग्रही मागणीही केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. students will get a tuition fee of Rs. 18 thousand per month

---Advertisement---

विद्यावेतनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बैठक घेण्यात आली होती. ही बैठक वडेट्टीवार यांच्या मागणीमुळे घेण्यात आली होती. या बैठकीत केलेल्या मागणीला यश मिळाले आहे.

कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिसा, दिल्ली , छत्तीसगड या राज्यांमध्ये मिळणाऱ्या विद्यावेतनाच्या तुलनेत महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता (इंटर्न) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन तुलनेने अत्यल्प आहे. याकडे वडेट्टीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधले होते. यामुळे अनेक वर्षांपासूनचा आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाठपुराव्याला यश मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे वडेट्टीवार यांनी आभार मानले आहेत.

---Advertisement---

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles