Thursday, March 13, 2025

विद्यार्थी मृत्यू ‘आप’चे आंदोलन ; शहरातील रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिटच्या मागणीसाठी आप रस्त्यावर

बीट निरीक्षकांच्या धर्तीवर सेफ्टी निरीक्षक नेमन्याची आपची मागणी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर

शहरातील शाहूनगर भागात खड्ड्यांच्या दुरावस्थेमुळे अपघातामध्ये शालेय विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डे हे अपघाताचे प्रमुख कारण आहे,चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आघाडीवर असणारे प्रशासन रस्त्याच्या दुरावस्थे बाबत मात्र उदासीन दिसते, त्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने दि. 28 नोव्हेंबर रोजी महापालिकेविरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरात प्रशस्त रस्ते असूनही मानवी चुकांमुळे मागील वर्षभरात 700 हुन जास्त अपघात होऊन 210 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
जगातील विविध स्मार्ट सिटी मध्ये रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमाना प्राधान्य दिले जाते.
त्यासाठी अपघात होऊ शकणाऱ्या जागा,परिस्थिती, सिग्नल यंत्रणा,पादचारी फुटपाथ याचे अपघात होऊ नये म्हणून व अपघात झाल्यावर ऑडिट केले जाते.शहरातील नामवंत कंपन्याच्या आवारात रोड सेफ्टी बाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.
मुंबई,बंगलोर येथील वाहतूक पोलीस व प्रशासन यंत्रणा वाहतूक नियमांच्या उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती,वाहन चालक यांच्यावर कठोर कारवाई करते,त्यामुळे त्या शहरांमध्ये अपघाती मृत्यू व गंभीर जखमीचे प्रमाण कमी आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शाळकरी मुलाचा झालेल्या मृत्यूची कारणे गंभीर पणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलीस व मनपा प्रशासन यांनी अपघातजन्य ठिकाणे शोधून शहरातील सर्व रस्त्याचे सेफ्टी ऑडिट करावे.बेकायदेशीर बांधकामे हेरण्यासाठी जसे बीट निरीक्षक आहेत,तसे शहरात सेफ्टी निरीक्षक नेमावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी भ्रष्टाचारात बरबटलेल्या महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढत महापालिका परिसरातील रस्त्यावरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे असल्याचा आरोप केला.
आपचे शहर संपर्कप्रमुख गोविंद माळी म्हणाले की रस्ते पाणी आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना प्राधान्याने पुरवायची असतील तर महापालिकेवर आपचीच सत्ता आणावी लागेल.

रस्त्यावरील खड्ड्याच्या दुरावस्थेबाबत महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी आणि आयुक्त शेखर सिंह यांना वेळोवेळी निवेदन देऊन खड्डे दुरुस्तीची मागणी केली होती परंतु संवेदना बधिर झालेले प्रशासन याची कुठलीही दखल घ्यायला तयार नसल्याचा आरोप आपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष ब्रह्मानंद जाधव यांनी केलं

यावेळी आपचे सामाजिक न्याय आघाडी प्रमुख चंद्रमणी जावळे मामा, शहर आय टी प्रमुख आशुतोष शेळके, उमेश साठे, सरोज कदम, भोसरी विधानसभा प्रचार प्रमुख स्वप्नील जेवळे, आजिनाथ सकट, सुरेश भिसे, गणेश करडे, विशाल जाधव, सोमनाथ बनसोडे, विक्की पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Lic

Lic

LIC

Related Articles

- Advertisement -

Latest Articles