Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घाटातील रेती तस्करी थांबविण्याची मागणी

---Advertisement---
नांदगाव खंडेश्वर तहसिलदारांना निवेदन देताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी

महसूल प्रशासनाने रेती साठा करून घरकुलासाठी कमी दरात उपलब्ध करा – माकप ची मागणी

---Advertisement---

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील अस्तित्वात असलेल्या रेती घाटावर रात्रीला बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात अवेद्य रेती उपसा होत आहे. त्याला तात्काळ थांबवण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तालुक्यातील बेंबळा नदी, (शिवणी) मिलमीली नदी (धानोरा शिक्रा) फुलगाव फाटा, शिरपूर, धारवाडी, पहुर, यासह इतर घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे. प्रशासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे महसूल प्रशासनाने स्वतः रेती जमा करून खेड्या- पाड्यातील व शहरात सुद्धा घरकुल लाभार्थी व गरजवंतांना अल्पदरात वितरित करावी अशी मागणी सुद्धा माकप ने निवेदनातून केली आहे.

अवैद्य रेती तस्करांचा गुंड प्रवृत्ती चा त्रास  प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागतो. रेती तस्करीला आळा घालून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी तालुका सचिव श्याम शिंदे अनिल मारोटकर, सह कार्य कर त्यांनी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना निवेदन दिले आहे. 

माकपच्या वतीने मागणी केली असता तालुक्यातील कोणताही घाट नैसर्गिक दृष्ट्या लिलाव करण्याच्या दृष्टीकोनातून योग्य नाही कारण पर्यावरणाच्या निकषानुसार तालुक्यातील घाटावर रेती उपसा  होऊ शकत नाही तालुक्यातील रेती घाटांवर महसूल प्रशासनाची करडी नजर ठेवून अवैद्य रेती उपसा करणारे व साठवणूक करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करू निवेदन देतेवेळी तहसीलदार यांनी माकप च्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles