Statue of Shivaji Maharaj : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्यानं राज्यात संतापाची लाट आहे. या पुतळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आणि देशाचे आराध्य दैवत असून, त्यांच्या पुतळ्याच्या कोसळण्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी खुल्या मंचावर माफी मागितली आहे.
अजित पवार (Ajit pawar) म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी मी माफी मागतो. शिवराय आपले दैवत आहेत. शिवरायांचा पुतळा पडणं हे आपल्या सर्वांना धक्का देणारं आहे.” तसेच त्यांनी पुढे म्हटले, “कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी याबद्दल महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो.”
पुढे ते म्हणाले, या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, मग ते कुणीही असूद्यात, वरिष्ठ अधिकारी असूद्या, खालचे अधिकारी असूद्या, कंत्राटदार असूद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे. शिवप्रेमींच्या भावना जपण्यासाठी आणि छत्रपतींच्या प्रतिष्ठेची जपणूक करण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास अजित पवारांनी दिला आहे.


हेही वाचा :
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
मोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष