जुन्नर : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१८) पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गुणवंत शिक्षक पुरस्काराबाबत…
यावेळी दोन वर्षाचे राहिलेले तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार घेण्याच्या संदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने विचारणा केली असता पुरस्कारासाठी आर्थिक सहाय्य (पोंन्सर ) भेटले तर एक मे च्या आत गुणवंत शिक्षक पुरस्कार घेतले जातील असे यावेळी समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
जुन्नर : श्री क्षेत्र वडज येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !
सोपे अवघड क्षेत्राबाबत
सोपे अवघड क्षेत्राबाबत पंचायत समिती शिक्षण विभागाने आलेल्या आक्षेपांवर वन विभाग, बांधकाम विभाग, दूरसंचार विभाग व इतर विभागात आक्षेपांची यादी पाठविण्यात आली होती, त्यात बिबट प्रवण क्षेत्र यादी जुन्नर व ओतूर विभागातून आलेली आहे. त्यात अनेक गाव बिबट्या प्रवण क्षेत्रात वाढलेली आहेत त्यामुळे त्या गावातील शाळा अवघड मध्ये आलेल्या आहेत. अवघड शाळांच्या यादीत संबंधित शाळा घेऊन यादी जिल्हा परिषद पुणे येथे पाठविण्यात आली आहे.
पगाराबाबत…
अनुदानाचे पैसे आज पंचायत समितीला पोहच झालेले आहेत पगार बिलाच्या तपासणीचे काम अर्थ विभागात चालू आहे. उद्या दुपारपर्यंत पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा होतील.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पुरवणी देयकेबाबत…
पाच महिने झाले 91 लाख रुपये पुरवणी बिलासाठी आलेले आहेत. अजूनही बिले शिक्षकांचा खात्यावर जमा झाली नाहीत या विषयी शिक्षक समितीने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी गटशिक्षणाधिकारी म्हणाल्या की बिले अर्थ विभागात दिली आहेत. लगेच शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने अर्थ विभागात जाऊन चौकशी केली अर्थ विभागात बिले आली आहेत. पगार झाल्यानंतर बिले तपासून लगेच संबंधित शिक्षकांच्या खात्यावर जमा केले जातील असे सांगितले.
सेवापुस्तक कॅम्प अपडेट बाबत…
लवकरच केंद्रनिहाय सेवापुस्तक अपडेट कॅप लावुन सेवा पुस्तक अपडेट केली जातील असे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी सांगितले.
10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी, आजच अर्ज करा !
MS-CIT वसुलीबाबत…
MS-CIT वसुलीला स्थगिती असल्यामुळे कोणत्याही बिलातून एमएससीआयटी वसुली केली जाणार नाही असे यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांने समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.
रजा मंजुरीबाबत…
रजा मंजुरीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी पंचायत समिती स्तरावर दिले असल्यामुळे ज्या शिक्षकांच्या रजा प्रस्ताव पंचायत समितीला आहेत. त्यांच्या रजा मंजूर करण्याचे काम सुरू आहे काही शिक्षकांच्या रजा मंजूर झालेल्या आहेत काही लवकरच मंजूर होतील असे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी सांगितले.
सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
यावेळी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी, कार्याध्यक्ष तुषार डुंबरे, उपाध्यक्ष विठ्ठल जोशी, सहचिटणीस नामदेव कोकाटे, उपाध्यक्ष राजेंद्र गारे, तालुका नेते नामदेव मुंढे व समिती शिक्षक उपस्थित होते.