पुणे: उर्फ रिंकू राजगुरु हीने आपल्या कारकीर्दीची सुरुवात सैराट या चित्रपटापासून केली.दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला या सिनेमात संधी दिली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली. सैराट हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला की ज्याने शंभर कोटींच्यावर कमाई केली. परंतु त्यानंतर तिने ज्या ज्या चित्रपटात काम केले ते तितकेसे यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे सध्या तिच्या या नवीन चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे.
या तिच्या नविन चित्रपटाचे नाव आठवा रंग प्रेमाचा असे आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असणार असल्याचे सांगण्यात येते. त्याच बरोबर हिंदीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते समीर कर्णिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे या चित्रपटातून अनेकांनी खूप अपेक्षा आहेत.अ टॉप प्रॉडक्शन च्या समीर कर्णिक यांनी आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात रिंकू ही विशाल आनंद याच्यासोबत दिसणार आहे. खशबू सिन्हा यांनी या चिञपटाचे दिग्दर्शन केले आहे.
रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद यांची जोडी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना किती आवडते हा येता काळच ठरवेल. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लॉन्च झाले असून रिंकू राजगुरु ने आपला इंस्टाग्राम वरून ते शेअर केले आहे.