माजलगाव : ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्व शिक्षा अभियानामार्फत हंगामी वसतिगृहे सुरू केलेली आहे. ही वसतिगृह ऊसतोड कामगार कारखान्याला जाण्याच्या वेळेस सुरू होणे गरजेचे आहे, परंतु आतापर्यंत ५० टक्के ऊसतोड कामगार कारखान्याला जाऊन सुद्धा अद्यापही बीड जिल्ह्यातील एकही ऊसतोड कामगारांच्या पाल्यांची वसतिगृह सुरू झालेली नाही. यामुळे कामगार हे आपल्या पाल्यांना कारखान्याला सोबत घेऊन जात आहेत, त्यामुळे सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ताबडतोबीने हंगामी वसतिगृहे सुरू करावी अशी मागणी डीवायएफआय युवा संघटना, ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा सचिव मोहन जाधव, ऍड. सय्यद याकुब, विजय राठोड, फारुक सय्यद, अशोक भुंबे, विनायक चव्हाण, विकी खापे, पांडुरंग डावरे आदींनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
---Advertisement---
---Advertisement---