ST Bus Accident : नांदेड ते लातूर महामार्गावर नांदगाव पाटी जवळ एसटी बस उलटून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 36 प्रवासी जखमी झाले असून 6 प्रवासी गंभीर आहेत. अहमदपूरकडून लातूरकडे ही एसटी बस जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मागून येणाऱ्या प्रवासी बसच्या चालकाने दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी तातडीने ब्रेक लावले आणि उजवीकडे वळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे बसचा तोल जाऊन ती रस्त्यावर कोलांटी उडी घेत उलटली. हा सर्व थरार अवघ्या 25 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये कैद झाला असून, तो पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
थरारक व्हिडिओ व्हायरल | ST Bus Accident
या अपघाताचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या अपघातात बस उलटल्याने 36 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. मदतकार्य सुरू करण्यात आले, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेक युजर्स दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

हे ही वाचा :
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खूलासा
मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत
मायावतींचा पुतण्या आकाश आनंदची ‘बसपा’ पक्षातून हकालपट्टी
माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल