Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याSSC Result : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

SSC Result : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ (MSBSHSE) उद्या, २७ मे २०२४ रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. १२ वीचा निकाल लागल्यावर १० वीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील या बाबत काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती. अखेर उद्या १० वीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळ ११ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बोर्ड अधिकारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेद्वारे १० वीचा निकाल जाहीर करतील, मात्र दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.

ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत घेण्यात आली होती. यावर्षी सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

SSC Result कसा तपासायचा:

१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खालील एका वेबसाईटला भेट द्या.
https://mahresult.nic.in/
https://mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
२. “दहावीचे निकाल २०२४” या लिंकवर क्लिक करा.
३. आपला रोल नंबर प्रविष्ट करा.
४. “सबमिट” बटणावर क्लिक करा.
५. आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.

SSC Result 2024 महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा

१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं अॅप घ्या
२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२४ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा
३. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२वी निकाल २०२४ साठी MHHSC सीट क्रमांक टाइप करा
४. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन

ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

भारतीय सेना अंतर्गत ‘कमिशन्ड ऑफिसर’ पदांची भरती

विशेष लेख : भारतातील कोळशाने “या” उद्योगपतीचे केले हात काळे !!

भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय