Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

Mahresult : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी www.mahresult.nic.in आणि www.mahahsscboard.in या संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतील. (10th 12th result)

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै दरम्यान, तर बारावीची परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे २६ जुलै रोजीच्या बारावीच्या विषयांची परीक्षा ९ ऑगस्ट रोजी, आणि दहावीच्या विषयांची परीक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात आली.

10th 12th result

यंदाच्या पुरवणी परीक्षांसाठी दहावीसाठी २८,९७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यामध्ये २०,३७० मुले, ६,६०५ मुली, आणि एक तृतीयपंथी विद्यार्थी होता. बारावीच्या परीक्षेसाठी ५६,८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यामध्ये ३६,५९० मुले, २०,२५० मुली, आणि पाच तृतीयपंथी विद्यार्थी होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय