Corona virus Cases : जगभरात थैमान घातल्यानंतर आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची चिन्हं दिसत आहेत. आशियामधील दोन महत्त्वाची शहरे हाँगकाँग आणि सिंगापूर येथे कोविड-19 रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट येणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोरोनाचा पुन्हा उद्रेक? | Corona virus Cases
कोविड-19 या विषाणूचा उद्रेक सर्वप्रथम 2019 मध्ये चीनमधील वुहान शहरात झाला होता. त्यानंतर संपूर्ण जगात या विषाणूने थैमान घातले. लाखो लोकांचे प्राण गेले, तर अब्जावधी लोकांचे जीवन विस्कळीत झाले. आर्थिक उलथापालथी तर वेगळीच. आता, काही काळ शांततेनंतर पुन्हा कोरोनाच्या नव्या लाटेची चाहूल लागली आहे. (हेही वाचा : एसटी महामंडळात 10,000 ते 15,000 पदांसाठी मेगाभरती)
हाँगकाँगमध्ये चिंताजनक परिस्थिती
हाँगकाँग सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या संसर्गजन्य रोग शाखेचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी सांगितले की, हाँगकाँगमध्ये कोविड-19 च्या पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी गेल्या वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्यांच्या मते, 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात एकूण 31 गंभीर प्रकरणे नोंदवण्यात आली, ज्यात मृत्यूंचाही समावेश होता.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “विषाणूची क्रिया मोठ्या प्रमाणात वाढली असून, गंभीर रुग्णसंख्येचा आकडा चिंतेचा विषय आहे.” त्यामुळे आरोग्य विभागाला अधिक दक्ष राहण्याची गरज भासत आहे. (हेही वाचा : ब्रेकिंग : लाडक्या बहिणींना 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार ; अजित पवार यांची मोठी घोषणा)
सिंगापूरमध्येही वाढती रुग्णसंख्या
सिंगापूरमधूनही अशाच प्रकारचे वृत्त समोर आले आहे. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये तब्बल 28 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.” स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा : AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 309 जागांसाठी भरती)
नवीन लाटेची शक्यता?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही देशांमध्ये कोविड-19 विषाणूचा संसर्ग दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ आणि अधिकारी नव्या लाटेची शक्यता व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले असून, काही ठिकाणी मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. (हेही वाचा : 17 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू, बीसीसीआयकडून नवीन वेळापत्रक जाहीर)
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे भारतासारख्या देशांसाठीही ही बाब धोक्याची घंटा ठरू शकते. देशाच्या आरोग्य यंत्रणांनी आतापासूनच सजग राहणे गरजेचे आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासांवर लक्ष ठेवणे, ताप, खोकला, थकवा यासारख्या लक्षणांची तपासणी करणे, आणि लसीकरणाच्या धोरणाचा आढावा घेणे ही काळाची गरज ठरत आहे. (हेही वाचा : खळबळजनक : शाळेत तब्बल 20 फुटांचा किंग कोब्रा आढळला)