उंबराचे वृक्ष महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. जंगलात, नदीच्या किनारी, डोंगर कपारीला रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर वाढलेले आढळतात. मंदिर व देवळाच्या परिसरात धार्मिक स्थळी उंबराची लागवडही केली जाते. (tree)
उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे. याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात. umbar tree
सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते. रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात.
वड, पिंपळ, औदुंबर सारख्या काही वृक्षांना महावृक्ष म्हणतात. जीवन साखळी मध्ये ह्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ ऑक्सिजन निर्मितीच नाही तर पाखरे, किडे, छोटे प्राणी ह्यांच्या असंख्य पिढ्यांचे ते अधिवास असते.
या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते, हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. शिवाय हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात. उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! जग हे बंदीशाला … राजा परांजपे यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटातले गीत सुप्रसिध्द आहे.
गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.उंबराची फळे खाता येतात.
उंबर हे त्यांचे खाद्य देखील असते. माकडे या झाडावर बसून निवांत उंबराची फळे खात असतात. गुरे-ढोरे-बकरे उंबराच्या झाडाखाली बसून पिकलेले फळे खाण्यासाठी ते पडण्याची वाट पाहत असतात. औषधी म्हणून या झाडाचा खुप मोठा उपयोग आदिम समाजात होतो. जिथे उंबराचे झाड असते तिथे पाण्याचा स्रोत हमखास असतो, अशी ग्रामीण भागात मान्यता आहे. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. अशा या बहुउपयोगी झाडाचा बीजप्रसार पक्षी करतात.
हेही वाचा :
मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला
शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!