Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Facebook, Instagram down : फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; वापरकर्ते हैरान

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया (Social media down) प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन (Facebook, Instagram down) झाले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी रात्री (5 फेब्रुवारी 2024) अचानक बंद झाले. युजर्सचे सोशल मीडिया अकाउंट अचानक लॉग आउट होत आहेत. Facebook, Instagram down, users bewildered

---Advertisement---

वापरकर्त्यांना दोन्ही प्लॅटफॉर्मवर लॉग इन करता येत नाही. फेसबुक ॲप उघडणाऱ्याला लॉग इन करण्यास सांगण्यात येत आहे. वारंवार प्रयत्न करूनही फेसबुकवर लॉग इन करता आले नाही. फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन सर्वत्र खळबळ उडाली आहे.

फेसबुक आणि इंस्टाग्राम ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांची सर्वात आवडती सोशल मीडिया साइट आहे. लोक क्षणाक्षणाला सोशल मीडिया वापरत असतात ते सोशल मीडिया शिवाय राहुच शकत नाही. अशात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याने वापरकर्त्यांना आपले सोशल मीडिया हॅक झाल्याचा समज होत आहे, मात्र सोशल मीडिया हॅक झाले नसून ते डाऊन झाले आहे.

---Advertisement---

फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात मीम्स तयार होत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #facebookdown ट्रेंडिंग सुरू झाले आहे. युजर्स त्यांच्या तक्रारींसोबतच याबाबत मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

मेटा कंपनीच्या मालकीचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदर देखील अनेकदा डाऊन झाले आहे.

हे ही वाचा :

सर्वात मोठी भरती : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागायचे नाही, तर… नाना पाटेकर यांचे मोठे विधान

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान

Jalgaon : जळगाव पोलिस विभाग अंतर्गत 137 जागांसाठी भरती

Nashik : नाशिक पोलिस विभाग अंतर्गत 118 जागांसाठी भरती

शाहरूख खानने दिला ‘जय श्रीरामचा नारा’, वाचा नेमकं काय घडलं

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles