Tuesday, December 3, 2024
Homeताज्या बातम्याSchool Wall Collapses : गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ...

School Wall Collapses : गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया रोड परिसरातील नारायण शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या पहिल्या मजल्यावरील लॉबीचा काही भाग आणि भिंत कोसळल्याने (School Wall Collapses) विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुजरातमधील नारायण शाळेत दुपारच्या लंचब्रेक दरम्यान शाळेतील काही विद्यार्थी जेवण करत होते तर काही गप्पा मारत होते. अचानक शाळेची लॉबी आणि भिंतीचा काही भाग कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या दुर्घटनेत ६ विद्यार्थी जखमी झाले असून इमारतीच्या खाली ठेवलेल्या सायकल्सची मोडतोड झाली आहे.

School Wall Collapses

शाळेची लॉबी आणि भिंतीचा काही भाग कोसळल्याच्या (School Wall Collapses) या दुर्घटनेत ६ विद्यार्थी जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे विद्यार्थ्यी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची इमारत १४ ते १५ वर्षे जुनी आहे. शाळेच्या व्यवस्थापनास इमारत जुनी असल्याचे माहिती असूनही कोणतीही आवश्यक दुरुस्ती केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन पालकांकडून केले जात आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

आयुक्त शेखर सिंह यांच्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केली, राहत्या घराची स्वच्छता

संबंधित लेख

लोकप्रिय