Saturday, March 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक : दौंडमध्ये कचराकुंडीत प्लास्टिकच्या डब्यात आढळले मृत अर्भके

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरालगत असलेल्या बोरावके नगर परिसरातील प्राईम टाऊनच्या मागील बाजूस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या डब्यांमध्ये बंद केलेली 6 ते 11 मृत अर्भके आणि मानवी अवशेष आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Daund Dead infants) ही घटना मंगळवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली, त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

---Advertisement---

प्राथमिक माहितीनुसार, गोपालवाडी गावाच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळील जिजामाता नगर परिसरात नितीन ढगे यांच्या टाटा शोरूमच्या मागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ही मृत अर्भके आढळली. स्थानिकांनी कचऱ्यात संशयास्पद वस्तू पाहिल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी दाखल झालेल्या दौंड पोलिसांनी पाहणी केली असता, प्लास्टिकच्या सीलबंद डब्यांमध्ये मृत अर्भके आणि काही मानवी अवशेष असल्याचे आढळून आले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा – भाजप आणि शिवसेनेची युती का तुटली ? मुख्यमंत्री फडणवीसांनी केला मोठा खूलासा)

बेकायदा गर्भपाताचा संशय | (Daund Dead infants)

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अर्भके बंद केलेली आढळल्याने पोलिसांना बेकायदा गर्भपाताचा संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दौंड पोलिसांनी आसपासच्या रुग्णालये, खासगी दवाखाने आणि गर्भपात केंद्रांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)

---Advertisement---

या अर्भकांचे आणि मानवी अवशेषांचे पोस्टमॉर्टम आणि न्यायवैद्यकीय तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानंतरच या प्रकरणातील पुढील तथ्ये स्पष्ट होतील. (हेही वाचा – खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; भत्त्यासह पेन्शनही वाढली)

नागरिकांमध्ये संताप

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “अशा प्रकारच्या घटना आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (हेही वाचा – धारावीत गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग, अनेक सिलेंडरचा स्फोट ; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल)

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून, हे अर्भके आणि अवशेष कोठून आले, कोणी फेकले आणि त्यामागील कारण काय, याचा शोध घेण्यासाठी सर्व शक्यतांचा विचार केला जात आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles