मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या कालच्या सभेत स्क्रिनवर माहीमची एक जागा दाखवली. या व्हिडीओत माहीममध्ये भर समुद्रात दर्गा बांधला जात असल्याचं त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणनू दिलं.जिल्हाधिकाऱ्यांकडून संबधित बांधकामाची तातडीने चौकशी करण्यात येत आहे. यासाठी सहा जणांचे पथकही बनवण्यात आले आहे. हे माहीमच्या खाडीत हे पथक पोहचलं आहे. पाहणी केल्यानंतर आज हे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू होणार आहे.
या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्रातील हे संबंधित अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर आम्ही त्याच्या बाजूला गणपतीचं मोठं मंदिर उभारु, असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला.
यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना संबंधित बांधकाम हटवावं नाहीतर आपण त्याच्या बाजूला गणपतीचं मोठं मंदिर उभारु, असा इशाराच दिला. ठाकरेंच्या इशाऱ्याने जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे.
मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दर्गाच्या ठिकाणी आले होते त्यांनी संपूर्ण दर्गा परिसराची पाहणी केली. हे बांधकाम एक-दोन वर्षांचं नव्हे तर खूप वर्षांपूर्वीचा आहे, असं काही जणाचं म्हणणं आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागात एकाकडे गेलो होतो. समोर पाहिलं तर मला समुद्रात लोकं दिसली. काय ते समजेना. मी एकाला सांगितलं की बघ रे काय ते. मग त्या माणसाने ड्रोन शूट करुन माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या.
प्रशानाचं दुर्लक्ष असल्यावर काय घडू शकतं, या गोष्टीचे गैरफायदे कशाप्रकारे घेतले जातात, तुमचं लक्ष असलं पाहिजे कोणत्या गोष्टी होतायत, जो घटना मानणारा मुसलमान यांना विचारणार आहे जे मी दाखवणार आहे ते तुम्हाला मान्य आहे का. मी हे दाखवण्याआधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, मुंबई मनपाचे आयुक्त, मुंबई पोलीस खात्याचे कमिश्नर विवेक फणसाळकर माझी सगळ्यांना विनंती आहे की, यावर जर समजा तुमची कारवाई होणार नसेल त्यानंतर महिनाभरानंतर काय होईल ते पाहिल्यावर मी सांगेल. हे माहीम आहे.
दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजीअली तयार करणार? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिश्नर, महापालिका आयुक्तांना आजच सांगतो महिन्याभरात कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाहीत. वाट्टेल ते फाजील चाळे चालणार नाही. एकदा माझ्याकडे राज्य आलं तर आख्खं राज्य सुतासारखं सरळ करेन. परत कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर शिंदे सरकारला जाग ; माहीम समुद्रातील अनाधिकृत दर्गा पाडणार..
संबंधित लेख