Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची भर सभेत थोबाडीत, वाचा सभेत काय घडले

सोलापूर : शिवसेना (शिंदे गटाचे) माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil Slapped Himself) यांनी एका सार्वजनिक सभेत स्वत:च्या हाताने स्वत:च्या थोबाडीत मारून घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सांगोला तालुक्यातील एका कार्यक्रमादरम्यान घडली. शहाजी बापू पाटील यांच्या या कृतीने परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

---Advertisement---

आपल्या या कृतीमागील कारण देताना शहाजी बापू म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनतेने पाणी देणाऱ्या व्यक्तीला निवडून न देता पाणी अडवणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून संसदेत पाठवले, ही जनतेची चूक आहे. या चुकीबद्दल त्यांनी स्वत:ला दोषी ठरवत ही कृती केली.  (हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा)

काय घडले सभेत? (Shahaji Bapu Patil)

सांगोला येथील एका कार्यक्रमात शहाजी बापू पाटील बोलत होते. व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आपल्या भाषणात शहाजी बापू यांनी जनतेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “ज्यांनी पाणी आडवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं. पण ज्यांनी तुम्हाला पाणी दिलं, त्यांना तुम्ही घरी बसवलं. ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली.” यानंतर त्यांनी अचानक स्वत:च्या हाताने स्वत:च्या चेहऱ्यावर जोरदार चापट मारली. (हेही वाचा – नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिला मजुरांचा मृत्यू)

---Advertisement---

व्हिडीओ व्हायरल

शहाजी बापू पाटील यांनी स्वत:ला थोबाडीत मारून घेतल्याचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्येही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर काहींनी केवळ पब्लिसीटी स्टंट असल्याचे म्हटले आहे.  (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)

शहाजी बापू यांचा राजकीय प्रवास

शहाजी बापू पाटील हे सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार असून, त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली तेव्हा शहाजी बापू हे शिंदे गटासोबत गेले होते. त्यांचा “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल…” हा गुवाहाटीतील डायलॉग राज्यभर गाजला होता. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles