मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या जन्मदिवस आहे. परंतु देशातील तरुणाई उद्या ‘बेरोजगार दिवस’ साजरा करणार असल्याचे समजते. यासंबंधी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल होत असून तरुणांना आवहान केले जात आहे. तसेच बेरोजगारी सबंधित ट्विट दिवसेंदिवस ट्रेंड वाढताना दिसत आहेत.
कोरोना महामारीचे संकट सातत्याने गडद होत असताना बेरोजगारी ही तितक्याच झपाट्याने वाढताना दिसत आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार रोजगार निर्माण करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप होत आहे.
२ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन प्रत्यक्षात न आल्यामुळे तरुणाई नाराज दिसत आहे. परंतु केंद्र सरकारने आम्ही तरुणांच्या बाजूने असल्याचे ही म्हटले आहे.
उद्याचे आंदोलन हे ट्विटरवर केले जाणार असून लोकांना सहभागी होण्याचे आवहान केले जात आहे. सरकारने तरुणांचा रोष कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.