पुणे : महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी सत्यशोधक चळवळीतील झुंजार नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना कॅन्सरची लागण झाली आहे. सध्या त्यांचे वय वर्ष ९२ सुरु आहे, हाडे ठिसूळ झालीत, मणकाही त्रास देतोय, निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधी मागे लागल्या आहेत, असं सांगत कॅन्सरची लागण झाल्याचं बाबा आढाव यांनी एका निवेदनातून सांगितलं आहे.
तसेच, मी लवकर या आजारावर मात करेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच आपण कोणीही चिंता बाळगू नये व मला भेटण्याची घाई करू नये. कारण या आजारामुळे व त्यावरील औषधोपचारामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे इनफेक्शन होणं माझ्या तब्येतीला धोकादायक ठरु शकते. बसल्या जागेवरुन जे काय सहकार्य तुम्हाला करता येईल ते ऑनलाईन करेन. वेळोवेळी मी तुम्हाला तब्येतीची खुशाली कळवत राहीलच. असेही बाबा आढाव यांनी पत्रात म्हटले आहे.
डॉ.अभिजीत वैद्य, डॉ.राजेंद्र कोठारी, डॉ. विजय रमणम हे आढाव यांच्यावर उपचार करत आहेत.