Tuesday, January 21, 2025

पिंपरी चिंचवड : सफाई कामगार महिलांचे महानगरपालिकेसमोर आंदोलन

कष्टकरी महिलांना दिवाळीनिमित्त बोनस द्या : बाबा कांबळे 

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सोळाशे सफाई कामगार महिलांना दिवाळीनिमित्त पगार एवढा बोनस मिळावा, कामगार कायद्याप्रमाणे मिळणारे लाभ पीएफ फंड या सुविधा मिळाव्यात, किमान वेतन मिळावे यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी कष्टकरी कामगार पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष अनिता सावळे, मधुरा डांगे, सविता लोंढे, मंगल तायडे, रुक्मिणी कांबळे, प्रमिला गजभार, मीना साळवे, जया धोत्रे आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले, ऐन सणासुदीच्या काळामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या महिलांवरती आंदोलन करण्याची वेळ येत आहे ते प्रशासनाचे अपयश असून महापालिका आयुक्त आणि त्यांचे प्रशासन नेमक कोणासाठी काम करत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे या सणांमध्ये साफ सफाई कामगारांना बोनस मिळाला पाहिजे मागील वर्षी देखील आम्ही आंदोलन केलं तेव्हा आम्हाला बोनस मिळाला, यावेळी देखील ठेकेदाराने बोनस नाकारल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे कांबळे म्हणाले.

महानगरपालिकेने साफसफाई कामाचा नवीन ठेका दिला असून यामध्ये आता कामगारांना कमी करण्याची व त्यांना चार तास मानधनावर काम करण्यास सांगितलं जात आहे, यामुळे नवीन ठेकेदारी पद्धतीमध्ये कामगार कायद्याचा भंग होत असून नवीन ठेका दिल्याने पूर्वीच्या कामगारांवर अन्याय होत आहेत. यामुळे महानगरपालिका आयुक्त यांनी नवीन ठेकेदारांना काम देण्याबाबत पुनर्विचार करून साफ सफाई कामगारांना कायम करावे असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles