वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : औद्योगिक नगरी मधील ग्रीव्ह्ज ग्रुप कंपन्यातील चार कंपन्यांमधील विलो कंपनीच्या स्थलांतरामुळे विभाजन होऊनही 67 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या ग्रीव्ह्ज समूह कामगार पतपेढीच्या मुख्यप्रवर्तक पदी शिवराज शिंदे यांची निवड करण्यात आली. ग्रीव्ह्ज समूहातील प्रीमियम एनर्जी, फोसिको इंडिया लिमिटेड, विलो म्याथर अँड प्लॅन्ट, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड मधील 1400 कामगार सदस्य असलेली ही पतपेढी विभाजन होऊनही कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी विभाजित झाली आहे, चारही कंपन्यांचे व्यवस्थापन या पतपेढीला सर्वतोपरी मदत करत आहेत, त्यामुळे कामगार हितासाठी एकत्र आहेत, असे शिवराज शिंदे यांनी सांगितले.

ग्रीव्हज समूह कामगार पतपेढी वर गेली सलग 6 वर्ष शिवराज शिंदे हे संचालक मंडळ सदस्य व सचिव म्हणून काम पाहत आहेत.फलटण लोकसेवा संघ,पुणे या तालुक्याच्या संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून गेली 7 वर्ष सामाजिक कार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी चार लिमिटेड कंपनी एकत्रित रित्या संघटित होऊन सहकार क्षेत्रातील दुर्मिळातील दुर्मिळ असे उदाहरण म्हणून संबोधले तरी वावगे होणार नाही ही संस्था विलो कंपनीच्या स्थलांतरामुळे आणि त्यांच्या मागनीमुळे दोन वेगवेगळ्या नवीन संस्थेमध्ये विभागली गेली. उपनिबंधक पुणे शहर-3 नागनाथ कंजेरी यांनी मुख्य प्रवर्तक शिवराज शिंदे यांना नेमणूकीचे पत्र दिले आहे.

दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी दोन्ही नवीन संस्थांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रिमियम ट्रान्समिशन प्रा.लि. कंपनीचे सीईओ राघवेंद्र किणी, प्रीमियम कंपनीच्या निशा सकारिया मॅडम ((ग्रुप सी HRO), महेश रंगोली( प्लांट हेड), सुरज कटोच (प्लांट एच आर) तसेच ग्रीव्हज कंपनीचे अविनाश शिनकर जनरल मॅनेजर आणि त्यांचे सहकारी व सर्व कामगार संघटनांचे नितिन आकोटकर, रवींद्र घाडगे आणि प्रिमियम ट्रान्समिशन लिमिटेड, ग्रीव्ह्ज लिमिटेड, विलो लिमिटेड तसेच फोसेको लिमिटेड, या चारही कंपनीतील संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. लेखा परीक्षक म्हणून किशोर जाधव यांचे मार्गदर्शन झाले, याचवेळी सहकार भारती चे कोशाध्यक्ष औदुंबर नाईक यांनी सर्व उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले संस्थेचा ताळेबंद संस्थेच्या व्यवस्थापक तोडकर मॅडम यांनी सादर केला. विलो कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल शेळके व सेक्रेटरी राजदत्त झेंडे ,जयंत हर्षे (DGM-HR-IR) यांनी शिवराज शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.


