Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

हाथरस प्रकरणी जळगाव मध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने घेतली निषेध सभा

---Advertisement---

जळगाव : हाथरस येथे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ आणि मयत बलात्कार पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि काही पुरोगामी संघटनांनी आज काव्यरत्नांवली चौकात निषेध सभा घेतली. त्यावेळी हाथरस येथे झालेल्या पूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवला गेला. 

या प्रसंगी सत्यशोधक विद्यार्थी संघटना जळगावचे कार्यकर्ते विकास मोरे, पियुष तोडकर, मेघना मराठे तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सुधाकर पाटील, सतीश सुर्वे, आकाश चौधरी आदी उपस्थित होते. त्यासोबतच जळगाव शहरातील सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला.

---Advertisement---

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास मोरे यांनी केले, तसेच झालेल्या घटनेवर मत नोंदवताना आपण अश्या विकृत मानसिकतेचा निषेध केला पाहिजे असे म्हटले. कार्यक्रमाची सांगता करताना हिमांशू पाटील यांनी पुरुषप्रधान मानसिकतेवर आघात केला. पुरुषांनी आपली वर्चस्ववादी मानसिकता सोडली पाहिजे, असे मत त्यांनी प्रकर्षाने नोंदवले. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles