Thursday, April 17, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC:राष्ट्रवादी युवक काँग्रेस भोसरी विधानसभा अध्यक्षपदी संतोष रतन शिंदे यांची नियुक्ती.

युवक अध्यक्ष इम्रान शेख यांची सोशल इंजिनिअरिंग


पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:रुपीनगर निगडी भागात स्वराज्य विश्व सेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेली १५ वर्षे सामाजिक कार्यातून लोकांमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केलेले. उच्चशिक्षित युवक ऍड. संतोष रतन शिंदे यांची
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.युवक शहराध्यक्ष इम्रान शेख आणि कार्याध्यक्ष सागर तापकीर यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली.संतोष शिंदे हे पेशाने वकील असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराचे खजिनदार देखील आहेत. त्यामुळे प्रभागातील तसेच शहरातील नाट्यकला,साहित्य, व सामाजिक क्षेत्रातील लोकसंपर्क दांडगा असून त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास होणार आहे.

यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले ” राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या सांगवी येथील मेळाव्यात युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर तसेच पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी पंकज बगाडे,आणि चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी विशाल क्षीरसागर यांची निवड केली होती.परंतु भोसरी विधानसभेसाठी दोन-तीन सक्षम तरुण इच्छुक असल्याने नियुक्तीला उशीर झाला. परंतु वरिष्ठांशी चर्चा करून संतोष शिंदे यांच्या रूपात अतिशय योग्य उच्चशिक्षित तरुणास भोसरी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी- पिंपरी- चिंचवड या तिन्ही विधानसभेत युवकांचे मेळावे आयोजित करण्यात येतील.

ॲड संतोष शिंदे म्हणाले, शरद पवार साहेब यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्रानुसार शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या पदाच्या माध्यमातून मी करणार असून.दिघी बोपखेल पासून ते निगडी पर्यंत सर्व भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी यांना पक्षात नव्याने सामावून घेण्याचे माझं ध्येय आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी दिलेल्या संधीचा मी नक्कीच सोने करेन”

यावेळी बोलताना कार्याध्यक्ष सागर तापकीर म्हणाले.”राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने गेल्या चार-पाच महिन्यामध्ये महत्त्वाच्या नागरी समस्यावर राष्ट्रवादी युवक च्या वतीने आम्ही निवेदन तसेच आंदोलन द्वारे महापालिके प्रशासनाला जाब विचारण्याचे काम करत आहोत.यापुढेही अजून जोमाने नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने केले जाईल.”
शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसची वाटचाल सुरू असून.शहराध्यक्ष इम्रान शेख हे अल्पसंख्याक समाजातून तर कार्याध्यक्षपदी सागर तापकीर, प्रदेश संघटक राहुल पवार हे पदाधिकारी
स्थानिक मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे असून, भोसरी विधानसभा अध्यक्षपदी ओबीसी समाजाचे संतोष शिंदे,तर पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी ख्रिश्चन समाजाचे पंकज बगाडे,तर चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी बौद्ध समाजाचे विशाल शिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार सर्व समाजातील उच्चशिक्षित तरुणांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन.उत्तम सोशल इंजिनिअरिंगचे एकमेव उदाहरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिले असल्याचे चर्चा नागरिकांमध्ये दिसून येते.

यावेळी युवक प्रदेश संघटक राहुल पवार,युवा नेते सचिन निंबाळकर,गौतम शिंदे, रजनीकांत गायकवाड,हाजी मलंग शेख,सुजित धाहिंजे आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles