Thailand Same Sex Marriage : थायलंडमध्ये 23 जानेवारी 2025 पासून समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता लागू झाली आहे. यामुळे दक्षिण-पूर्व आशियामध्ये थायलंड हा असा कायदा मंजूर करणारा पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक दिवसानिमित्त थायलंडमधील मोठ्या प्रमाणावर समलैंगिक जोडप्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभाग घेतला. (LGBTQ+ Marriage)
एलजीबीटीक्यू+ समुदायासाठी हा मोठा विजय मानला जात असून, गेल्या एक दशकाहून अधिक काळ या समुदायाने या हक्कांसाठी संघर्ष केला होता. विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर समलैंगिक जोडप्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून त्यांनी याला “स्वप्न साकार झाले” असे म्हटले आहे.
नव्या कायद्यामुळे समलैंगिक जोडप्यांना आर्थिक, कायदेशीर आणि वैद्यकीय अधिकार मिळाले आहेत. तसेच, त्यांना मुल दत्तक घेण्याचाही अधिकार प्रदान करण्यात आला आहे. थायलंडच्या संसदेत हा विधेयक मंजूर झाल्यानंतर गेल्या वर्षी राजा यांनी त्याला अंतिम स्वीकृती दिली होती.
LGBTQ+ Marriage आशियामधील तिसरा देश
थायलंड हा आशियामधील तैवान आणि नेपाळनंतर समलैंगिक विवाहाला (LGBTQ+ Marriage) कायदेशीर मान्यता देणारा तिसरा देश ठरला आहे. या प्रसंगी माजी पंतप्रधान श्रेष्ठा थाविसिन यांनी टिप्पणी करताना म्हटले, “आम्ही अमेरिकेपेक्षा जास्त प्रगतीशील आहोत.”
पंतप्रधान पैतोंगटार्न शिनवात्रा यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “आज थायलंडमध्ये रेनबो फ्लॅग अभिमानाने फडकत आहे.” नव्या कायद्यानुसार पुरुष, महिला, पती, पत्नी यांसारख्या शब्दांऐवजी जेंडर न्यूट्रल शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही विवाहाचा अधिकार मिळाला आहे.
थायलंडच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत असून, एलजीबीटीक्यू+ समुदायासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हे ही वाचा :
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, गावकऱ्यांची कुटुंबावर बहिष्काराची धक्कादायक घटना
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित