Monday, February 10, 2025

PCMC : नेताजी सुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी लढणारे आणि आपल्या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राला स्फूर्ती मिळवून देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि १९२१ साली इंग्लंडला जाऊन भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंग्रजांनी दिलेली संधी नाकारून इंग्रजांची चाकरी करण्यास नकार देऊन गांधीजींच्या इंग्रज सरकारच्या विरोधातील असहकार आंदोलन चालवले असे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज विनम्र अभिवादन करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली. (PCMC)

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखात, उपाध्यक्ष राजेश माने, संघटक निरंजन लोखंडे, विनोद गवई,मनपा सदस्य किरण साडेकर, सलीम डांगे, अनिता मोरे, विजया पाटील, रंजना काळे, अनिता जावळे, निखिल मोरे, हेमंत जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की बाळासाहेबांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली. ‘समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे मात्र यात मराठी माणूस मागेच राहिला, महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. असे महाराष्ट्रातील तरूणांच्या रोजगानिर्मिती साठी प्रयत्न केले.

महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला मेळावा १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. तेंव्हापासून आजपर्यंत परंपरा सुरू आहे.

PCMC

सुभाष बाबुनी कोलकत्यामध्ये तिरंगी ध्वज फडकावत विराट मोर्चाचे नेतृत्व केले, तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले त्यानंतर सुभाष बाबू तुरुंगात असताना गांधीजीनी इंग्रज सरकार बरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. सुभाष बाबुना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला मात्र ते इंग्रजापुढे झुकले नाहीत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles