18 जुलै ते 22 जुलै 2023 च्या दवंडी यात्रेत हजारोंच्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधव उपस्थित राहणार – आण्णासाहेब कसबे
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्रात सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण (अ ब क ड) व आर्टी निर्मितीसाठी पुणे ते मुंबई दवंडी यात्रा 18 जुलै ते 22 जुलै 2023 दरम्यान दवंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधव सक्रिय सहभागी होण्यासाठी 9 जुलै 2023 रोजी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सांस्कृतिक भवन यमुनानगर निगडी या ठिकाणी दुपारी 12-00 वाजता जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे व संदीपान झोंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ जयंती मोहत्सव समिती अध्यक्ष आण्णासाहेब कसबे यांनी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत शेकडो मातंग समाज बांधव उपस्थित राहुन हजारोंच्या संख्येने दवंडी यात्रेत सहभागी होण्याचा संकल्प करण्यात आला.माजी अध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख युवराज दाखले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मातंग समाजाचे जेष्ठ नेते संदीपान झोंबाडे, माजी अध्यक्ष आण्णा लोखंडे, भगवान शिंदे, युवराज दाखले, हनुमंत नाना कसबे, सतिश भवाळ, रामदास कांबळे, डी पी खंडागळे, मुंबई वरून सकल मातंग समाजाचे समन्वयक ॲड.राम चव्हाण, रमेश गाफाडे, ॲड मारूती वाडेकर नांदेड, सुदाम धुपे पनवेल, सुरेश साळवे, संजय धुतडमल, डॉ धनंजय भिसे सर, शहीद संजय ताकतोडे यांचे मोठे भाऊ हनुमंत ताकतोडे, शंकर तडाखे, भास्कर नेटके, अशोक लोखंडे.
पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष पंढरीनाथ अढाळगे, मयुर जाधव, स्वप्नील जाधव, चंद्रकांत लोंढे, उद्योजक अनिल गायकवाड, शिवाजीराव खडसे, शिवाजीराव साळवे, रामेश्वर बावने, विशाल कसबे, राजु आवळे, सविता ताई आव्हाड, मालनताई कांबळे, मा सरपंच संदिप जाधव, पत्रकार देवा भालके, नाना कांबळे, अनिल तांबे, राजु चव्हाण, बालाजी गवारे, लखन अडागळे, सचिन डुबळे, दिपक लोखंडे, कैलास वारगे, शेषनारायण पवार, साहेबराव साळवे, बंदु चांदणे, अर्जुन कदम, रोहन सुर्यवंशी, कृष्णा वाघमारे, एस,एस,धुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अनिल गायकवाड यांनी आलेल्या समाजबांधवाचे आभार मांडले. विशाल कसबे यांनी सुत्रसंचलन केले.
हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार
कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद
रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

