Tuesday, April 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक : भाजप नेत्याने पत्नी आणि 3 मुलांवर झाडल्या गोळ्या; तिन्ही मुलांचा मृत्यू

सहारनपूर (उत्तर प्रदेश) : सहारनपूरच्या (Saharanpur) गंगोह परिसरातील संगाठेडा गावात भाजप नेत्याने आपल्या पत्नीवर आणि तीन निष्पाप मुलांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी योगेश रोहिला (Yogesh Rohila) याला पोलिसांनी अटक केली आहे.

---Advertisement---

शनिवारी दुपारच्या सुमारास भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य असलेल्या योगेश रोहिला याने आपल्या पत्नी नेहा आणि तीन मुलांवर गोळ्या झाडल्या. मृत मुलांमध्ये 11 वर्षीय श्रद्धा, 6 वर्षीय शिवांश आणि 4 वर्षीय देवांश यांचा समावेश आहे. रोहिला याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वादाच्या दरम्यान संतापाच्या भरात हे अमानुष कृत्य केले. (हेही वाचा – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे)

Saharanpur | तिन्ही मुलांचा मृत्यू

गोळ्यांचा आवाज आणि आरडाओरड ऐकून गावात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या गंगोह पोलिसांनी आरोपीला परवानाधारक पिस्तूलसह अटक केली. पोलिसांनी जखमींना तात्काळ गंगोह सीएचसीमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान 11 वर्षीय श्रद्धाचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक असल्याने उर्वरित सर्वांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 4 वर्षीय देवांश आणि 6 वर्षीय शिवांश यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नी नेहा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा – राज्यात लवकरच 10,500 रिक्त पदांसाठी पोलीस भरती होणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा)

---Advertisement---

घटनेबाबत माहिती देताना एसएसपी रोहित सिंह सजवान यांनी सांगितले की, आरोपी योगेश रोहिला याने स्वतः पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. (हेही वाचा – IPL चे सामने फ्री बघायचेत ? फक्त या सोप्या पायऱ्या करा)

या भयंकर घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles