Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडेची ६१ लाखांची फसवणूक, इन्स्टाग्राम लाईक्सचा नाद पडला भारी

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय हास्यकलाकार सागर कारंडे (Sagar Karande) याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या सागरची सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६१ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

---Advertisement---

इन्स्टाग्रामवरील पोस्ट्सना लाईक करण्याच्या साध्या आमिषाला बळी पडून सागर कारंडे आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणाने मराठी सिनेसृष्टीसह सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण? | Sagar Karande

सागर कारंडे हा सोशल मीडियावर सक्रिय असणारा कलाकार आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तो नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असतो. अशातच काही दिवसांपूर्वी त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून इन्स्टाग्रामवर संपर्क साधण्यात आला. या व्यक्तीने सागरला “इन्स्टाग्रामवर पोस्ट्स लाईक करा आणि प्रत्येक लाईकसाठी १५० रुपये मिळवा” असे आमिष दाखवले. सुरुवातीला ही ऑफर सागरला आकर्षक वाटली. विश्वास संपादन करण्यासाठी या सायबर चोरट्यांनी सागरच्या बँक खात्यात २२ हजार रुपये जमा केले, ज्यामुळे त्याचा त्यांच्यावरील विश्वास वाढला. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)

---Advertisement---

पण ही केवळ एक सापळा होता. पुढे या व्यक्तींनी सागरला सांगितले की, मोठ्या रकमेची कमाई करण्यासाठी त्याला काही “टास्क” पूर्ण करावे लागतील आणि त्यासाठी आधी काही रक्कम गुंतवावी लागेल. सागरने टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवायला सुरुवात केली. त्याला सांगण्यात आले की, “टास्क पूर्ण झाल्यावर सर्व पैसे परत मिळतील.” यात त्याने १९ लाख रुपये गुंतवले आणि त्यावर ३० टक्के कर म्हणून आणखी रक्कम भरली. अशा प्रकारे एकूण ६१ लाख ८३ हजार रुपये सायबर चोरट्यांनी उकळले. शेवटी जेव्हा सागरला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)

पोलिस कारवाई आणि तपास

या प्रकरणाची माहिती मिळताच सागरने मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू केला आहे. सायबर पोलिसांचे पथक या फसवणुकीमागील मास्टरमाइंडचा शोध घेत आहे. सागरच्या बँक खात्याचा तपशील, संवादाचे पुरावे आणि इतर डिजिटल माहिती गोळा करून पोलिस पुढील कारवाई करत आहेत. तथापि, सायबर गुन्हेगारांनी बनावट ओळख आणि डिजिटल पाऊलखुणा लपवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तपासात अडचणी येत आहेत.  (हेही वाचा – यूपी सरकारच्या बुलडोजर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका, 60 लाख रुपयांचा दंड, पीडितांना नुकसान भरपाईचे आदेश)

सागर कारंडेच्या या प्रकरणाने सायबर गुन्हेगारीचं वाढतं संकट पुन्हा एकदा समोर आणलं आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. तज्ञांच्या मते, अशा प्रकरणात गुन्हेगार सामान्य लोकांना लहान आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करतात आणि नंतर मोठ्या रकमेची लूट करतात. सायबर सुरक्षा तज्ञांनी लोकांना असा सल्ला दिला आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या ऑफरवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी आणि बँक तपशील शेअर करू नये. (हेही वाचा – अमेरिका भारतावर 26 टक्के आयात शुल्क आकारणार)

सागर कारंडे हा ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रकाशझोतात आला. त्याच्या अफलातून विनोद टायमिंग आणि बहुरंगी अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय त्याने अनेक नाटकांमध्येही काम केले असून, ‘फू बाई फू’ सारख्या कार्यक्रमातूनही त्याने आपली छाप पाडली. (हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles