नारायणगाव, ता.४ : रोटरी क्लब नारायणगाव व दिपाली डेव्हलपर्स नारायणगाव यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “रोटरी दिवाळी पहाट-२०२१” या कार्यक्रमास नारायणगाव परिसरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशीच्या दिवशी पहाटे साडेपाच ते साडेआठ या तीन तासांच्या सुरेल व मंगलमय गीतांनी नारायणगावकर यांना मंत्रमुग्ध केले. पुणे येथील प्रणाली काळे प्रस्तुत “अविष्कार सुरांचा” या कार्यक्रमाने उपस्थित प्रफुल्लित झाले होते.
या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, अमित बेनके, डॉ.अमोल बेनके, गौरी बेनके, पल्लवी बेनके, धनश्री बेनके, तुषार लाहोरकर, सचिन काजळे, हितेंद्र गांधी, अरुण चिखले, मोहन जाधव, जितेंद्र गुंजाळ, दिपक वारुळे, संपत शिंदे, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, महेंद्र गणपुले, प्रथमेश जवळेकर, स्नेहल जवळेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपली प्रत्येक पहाट अशीच सुरेल होवो असे मत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले. ‘आली माझ्या घरी ही दिवाळी, बोलावा विठ्ठल’ यासारख्या गीतांनी श्रोते तल्लीन झाले.
रोटरी क्लब नारायणगावचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्रह्मे, डॉ. आनंद कुलकर्णी, डी.डी. डोके, प्राचार्य श्रीकांत शेवाळे, अशोक भराडीया, राजेंद्र बोरा, डॉ.हनुमंत भोसले, डॉ.मयुरेश वामन, डॉ.रामदास उदमले, संजीव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नयनरम्य फुलांची रांगोळी, दिपोत्सव त्यांची आरास, आकाश कंदीलांची सजावट, फटाक्यांची आतषबाजी यामुळे रघुकुल मंगल कार्यालयाचा परिसर उजळून निघाला.
रोटरी क्लब नारायणगाव तर्फे आयोजित ऑनलाइन गीत गायन स्पर्धेच्या विजेत्यांना आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केली. श्री प्रथमेश ज्वेलर्स प्रा.लि. यांनी कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेतले होते. त्यांच्यामार्फत उपस्थितांसाठी लकी ड्रॉ आयोजन करून पाच विजेत्यांना “सुवर्ण नथ” प्रदान केली.
दिवाळी पहाट कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन करण्यात अध्यक्ष मंगेश मेहेर, योगेश भिडे, सचिन घोडेकर, डॉ. प्रशांत काचळे, माऊली लोखंडे, स्वप्नील जुन्नरकर, प्रा. लहू गायकवाड, संदीप गांधी, कमलाकांत मुंढे, प्रशांत ब्रह्मे, तेजस वाजगे, ब्रिजेश बांदिल, प्रसाद बांगर, दिपक पटेल, अमित वालझाडे, मनोहर वाघ, फर्स्ट लेडी निर्मला मेहेर, रेखा ब्रह्मे, अमृता भिडे, प्रिया घोडेकर, डॉ.केतकी काचळे, सुनिता बोरा, मंजुश्री लोखंडे, सिमा महाजन, रिनाली वामन, अमृता जुन्नरकर, मीना शेवाळे, छाया गायकवाड, निशा बांदिल यांचे मोठे योगदान लाभले.
कार्यक्रमासाठी रोटरी क्लब नारायणगाव, नारायणगाव हायवे, जुन्नर, आळेफाटा, मंचरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत महाजन आणि प्रिया कामत यांनी केले.