पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: 74 व्या प्रजासत्ताकदिना निमित्त स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान शरदनगर चिखली यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला त्यानिमित्ताने ,भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन,ध्वजारोहण,राष्ट्रगीत तसेच लार्जेस्ट ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक एकनाथ पवार व डॉ. विजय भळगट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सचिन सानप,निलेश नेवाळे,मेदनकर काका यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम तेलगी,महादेव कवितके,विश्वास सोहनी ,प्रमोद सोनवणे यांच्या उपस्थितीत परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून e-waste इलेक्ट्रॉनिक उपकरण दान करून या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे, उपाध्यक्ष संतोष ठाकूर,मिलिंद वेल्हाळ, महेश मांडवकर, वैजनाथ गुळवे , बापू साळुंखे,राजेश दादा चिट्टे,सुनील खंडाळकर, सिद्राम मालगती, मोहन सावरे, विक्रम ठाकुर दिलीप मांडवकर यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडला.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/01/IMG-20230127-WA0006-1024x768.jpg)