Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मनोहर भिडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून याला तातडीने अटक करा – भाकपची मागणी

बार्शी : मनोहर भिडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून याला तातडीने अटक करा, या मागणी घेऊन बार्शीतील पुरोगामी पक्ष, संस्था संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त वतीने दिनांक 2 ऑगस्ट 2023 वार बुधवार रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहापुढे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आली. यावेळी भिडेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून निदर्शकांनी परिसर दणाणून सोडला.

---Advertisement---

संभाजी भिडे हा खरा मनोहर कुलकर्णी आहे, देशाचे स्वातंत्र्य, संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यावर हा व्यक्ती आक्षेपार्य वक्तव्य करत आहे, महिला बद्दल अत्यंत निंदनीय वक्तव्य यांनी केली आहेत, मनोहर भिडे हा समाजामध्ये जातीय सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, भिडेने महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आदी महापुरुषांची बदनामी करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे, सामान्य बहुजनांच्या कुटुंबातील मुलांवर धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी हा सातत्याने काम करत आहे, त्यामुळे संभाजी भिडे वर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा व त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. डॉ. प्रवीण मस्तुद, अनिरुद्ध नखाते, भारत भोसले, किसान सभेचे कॉ. लक्ष्मण घाडगे, किसन मुळे, लहू आगलावे, धनाजी पवार, अनिसचे प्रा. डॉ. ए. बी. कदम, प्रा. हेमंत शिंदे, दलित अधिकारांदोलनाचे भिम मस्के, काँग्रेसचे सतीश पाचकुडवे, वसीम पठाण, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, पुरवणी विचार मंचचे रमेश गवळी, नागनाथ सोनवणे, दलित महासंघाचे संदिपान आठ तसेच प्रा. डॉ.नवनाथ दनाने, अजित कांबळे वंचित चे शोएब सय्यद आदी उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles