Home नोकरी Home Guard : बृहन्मुंबईत २७७१ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा...

Home Guard : बृहन्मुंबईत २७७१ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

बृहन्मुंबईत २७७१ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज Recruitment Process for 2771 Home Guard Posts in Brihanmumbai, Apply

Home Guard Brihanmumbai : बृहन्मुंबईतील (Brihanmumbai) पुरुष आणि महिला गृहरक्षकांसाठी (होमगार्ड) २७७१ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवारांना १० जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Home Guard)

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा :
होमगार्डसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा २० ते ५० वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. उंची आणि शारीरिक पात्रतेसाठी पुरुष उमेदवारांची उंची किमान १६२ सेमी, महिलांसाठी १५० सेमी असणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी छातीची जाडी किमान ७६ सेमी असावी.

आवश्यक कागदपत्रे :
उमेदवारांना अर्ज करताना पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील:

  • निवासाचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • जन्मतारीख दाखला
  • १०वी बोर्डाचे प्रमाणपत्र
  • शाळेचे प्रमाणपत्र
  • तांत्रिक पात्रता असल्यास प्रमाणपत्र
  • खाजगी नोकरी करत असल्यास कोणतेही क्रियाकलाप प्रमाणपत्र नाही
  • ३ महिन्यांच्या आत पोलीस वर्तन प्रमाणपत्र

Home Guard भरती प्रक्रिया :
मुंबईत होमगार्डच्या रिक्त पदांसाठी यापूर्वीही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी १५०० होमगार्डची भरती करण्यात आली होती. सध्या पोलिस दलावर असलेल्या कामाचा भार कमी करण्यासाठी होमगार्डची भरती आवश्यक असल्याने २७७१ पदांसाठी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?
अर्जाची नोंदणी प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज भरून आपली नोंदणी निश्चित करावी.

हे ही वाचा :

मुंबई विद्यापीठ अंतर्गत नोकरीची संधी, असा करा अर्ज

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत नवीन भरती

नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 1333 जागांसाठी भरती

पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये

IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी

सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती

केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

Navy Bharti : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

UPSC मार्फत 457 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत भरती

Clerk Bharti : “या” सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती

UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती

Exit mobile version