नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) : रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. (RBI Repo Rate) आता रेपो रेट 6 टक्के झाला आहे, ज्याचा थेट फायदा कर्ज घेणाऱ्यांना होईल. या निर्णयामुळे कर्जाचा हप्ता कमी होणार असून, कर्ज घेणाऱ्यांना मासिक ईएमआयमध्ये देखील कमी रक्कम भरावी लागेल.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण बैठकीत या निर्णयाची घोषणा केली. यामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल आणि ग्राहकांसाठी कर्ज स्वस्त होऊन खरेदीला प्रोत्साहन मिळेल. गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जांवर व्याजदर कमी होणार असून, कर्ज घेणाऱ्यांना मासिक इएमआयमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 6.7 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यावर्षी महागाईचा दर 4.2 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
रेपो रेटचे महत्त्व आणि त्याचा प्रभाव : (RBI Repo Rate)
आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ही देशातील केंद्रीय बँक असून ती सर्व बँकांना वित्तपुरवठा करते. हे वित्तपुरवठा कसा केला जातो, याचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे रेपो रेट. रेपो रेट म्हणजे आरबीआय ज्या दरावर इतर बँकांना कर्ज देते. जेव्हा आरबीआय या दरात बदल करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्ज वितरणावर होतो, आणि याचा ग्राहकांवर देखील परिणाम होतो.
- रेपो रेट वाढल्यास:
महागड्या कर्जांचा परिणाम : जर आरबीआय रेपो रेट वाढवते, तर बँकांना महागड्या दरात कर्ज मिळते. याचा अर्थ, बँकांना कमी खर्चात कर्ज मिळत नसल्यामुळे ते त्यांच्या कर्जांवर व्याजदर वाढवतात.
गृहकर्ज आणि अन्य कर्जांवर प्रभाव : रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर प्रकारच्या कर्जांवर व्याजदर वाढतात. यामुळे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना अधिक EMI (इक्विटी मंथली इंस्टॉलमेंट) चुकवावी लागतात, जे त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करतात.
महागाई आणि कमी कर्ज घेतल्याचे प्रमाण : उच्च व्याजदर महागाईचे नियंत्रण करण्यासाठी असू शकतात, परंतु यामुळे ग्राहक कर्ज घेण्यास कमी इच्छुक होऊ शकतात. परिणामी, अर्थव्यवस्थेत खरेदी कमी होऊ शकते.
- रेपो रेट कमी झाल्यास:
कर्ज स्वस्त होणे : जर रेपो रेट कमी केला, तर बँकांना कमी दरात कर्ज मिळते. यामुळे बँकांना कर्जाच्या व्याजदरात कपात करता येते आणि ग्राहकांसाठी कर्ज स्वस्त होते. (हेही वाचा – मोठी बातमी : मनसे पक्षाची मान्यता रद्द होणार ? राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका)
ग्राहकांना फायदा : जे लोक गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा इतर कर्ज घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना कमी व्याजदराच्या कर्जाचा फायदा होतो. यामुळे त्यांच्या मासिक EMI मध्ये कमी पैसे भरावे लागतात. (हेही वाचा – महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटातील दृश्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप)
आर्थिक सक्रियता : स्वस्त कर्जामुळे ग्राहक अधिक खरेदी करत असतात, जे अर्थव्यवस्थेत सक्रियतेला चालना देऊ शकते. उद्योग क्षेत्रालाही याचा फायदा होतो, कारण ग्राहकांचा खरेदीवर दबाव कमी होतो. (हेही वाचा – कामाची बातमी : ‘आपले सरकार’ पोर्टल १४ एप्रिल पर्यंत राहणार बंद)