Saturday, March 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी या नव्या पक्षाची स्थापना केली असून, हा पक्ष आगामी विधानसभेच्या २५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या जागांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदारसंघांचा समावेश आहे.

---Advertisement---

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आपली हकालपट्टी झाल्याचे ऐकून तुपकर (Ravikant Tupkar) यांना धक्का बसला. “संघटनेसाठी मी अनेकदा जेलमध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. अशा स्थितीत राजू शेट्टी यांनी जी भूमिका घेतली, ती ऐकून मला धक्का बसला,” अशी खंत तुपकर यांनी व्यक्त केली. २००७ मध्ये संघटना कोल्हापूरपर्यंत मर्यादित होती, परंतु आज संघटना नाव-रूपाला आली आणि माझी गरज संपली असे त्यांनी नमूद केले.

नव्या पक्षाची स्थापना आणि आगामी योजना (Ravikant Tupkar)

रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत चार तास बैठक घेतली आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना करत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर निवडणूक लढवणार आहे, ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदारसंघांचा समावेश आहे.”

---Advertisement---

राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली जाईल आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार आहे असे तुपकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles