खेड : कोकणात अतिवृष्टी सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना महापूर आलेला आहे, अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी भात खाचरात, गावागावात शिरल्यामुळे जनजीवन ठप्प आहे. (Ratanagiri)
सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर येऊन नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली मार्गावर असलेल्या नारंगी नदीला देखील पूर आल्यामुळे खेड-दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. (Ratanagiri)
मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर मोठ मोठे खड्डे पडले असून मुबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर पुलाच्या सळ्या दिसतील एवढे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे जगबुडी नदी पुलावरील वाहतूक तत्काळ थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केली आहे
जगबुडी नदीवरील नव्या पुलावर भगदाड
मुंबई महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या जगबुडी नदी पूल हा ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे खड्डेमय झाला आहे तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर पीलरच्या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून चक्क पूलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सळ्या देखील दिसत आहेत यामुळे महामार्गावरील जगबुडी नदी पूल धोकादायक ठरला आहे.
त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक इतर ठिकाणा वरून वळवण्यात आली आहे, ८ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या पुलाची दुर्दशा झाली आहे. (Ratanagiri)