Raj Thackeray : आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची मोठी घोषणा केली.
राज ठाकरे म्हणाले, “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोकं काही करून सत्तेत बसवायचे आहेत. अनेक लोकं हसतील. हसू दे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार.” त्यांनी यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवण्याची माहिती दिली आणि सर्व्हे करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीसमोर आव्हान उभं राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पावसाचा अंदाज घेऊन हा दौरा असेल आणि यावेळी ते पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला आहे.


हेही वाचा :
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत
मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !
ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
दि. लातूर अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत भरती
शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार