Thursday, September 19, 2024
Homeताज्या बातम्याRailway Recruitment : खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती...

Railway Recruitment : खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

Railway Recruitment : देशातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने टेक्निशियन पदांसाठीच्या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले होते, ज्यात आता 5,254 नवीन पदांची वाढ करून एकूण 14,298 पदांची भरती होणार आहे.

आरआरबी टेक्निशियन (RRB technician Recruitment) भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया 9 मार्च ते 8 एप्रिल 2024 दरम्यान सुरू होती. मात्र, आता आरआरबी पुन्हा एकदा या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करणार आहे. यासंबंधी लवकरच नवीन नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी indianrailways.gov.in या रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करणे आवश्यक आहे. (Railway Recruitment)

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :

  • टेक्निशियन ग्रेड 1 साठी उमेदवाराकडे बीई, बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंगची डिग्री कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.
  • टेक्निशियन ग्रेड 3 साठी, 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आणि आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 36 वर्षे असावे. हे वय 1 जुलै 2024 या तारखेच्या आधारावर निश्चित केले जाईल. राखीव गटातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

अर्ज शुल्क :

  • सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • राखीव श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
  • शुल्क भरताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करावा लागेल.

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड मोड परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी तयारीला लागण्याची गरज आहे.

रेल्वेमध्ये टेक्निशियन पदांच्या या भरतीमुळे अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून अधिक माहिती घेऊन अर्ज करावा.

Railway Recruitment

google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती

ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

GAIL India : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 391 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत 580 जागांसाठी भरती

PDKV : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती

Air Force : भारतीय हवाई दलात लिपिक, ड्रायव्हर व अन्य पदांसाठी भरती

भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी

Bharti : नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत भरती सुरू

indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 300 पदासाठी मोठी भरती

Konkan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी भरती

Bharti : नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत भरती सुरू

Thane : ठाणे येथे प्राध्यापक पदाच्या 34 जागांसाठी भरती

Mumbai : भारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय