Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PFI व आरएसएस वर राहुल गांधींचं वक्तव्य नव्या शैक्षणिक धोरणाला विरोध !

दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केलेल्या बंदीच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे.त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) भाष्य करत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले, मला असं वाटतं द्वेष पसरवण्याचं काम कोणती व्यक्ती करतेय तसेच ती कुठल्या समाजाची आहे हे महत्वाचं नाही. द्वेष आणि हिंसेसारखी देशविरोधी कृत्ये जो कोणी करेल अशा लोकांविरोधात आपण लढू. आरएसएसवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणं आरएसएसनं ब्रिटिश आणि सावरकर यांना मदत करण्यासाठी नियमित पगार दिला जात होता. स्वातंत्र्य संग्रामात भाजपचा कधीही सहभाग नव्हता. भाजप ही तथ्ये नाकारु शकत नाही. पण काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला आमचा विरोध आहे कारण, हे धोरण आपली मुल्ये आणि देशावर आघार करणार आहे. यामुळं आपल्या इतिहास विकृत होणार आहे. यामुळं काही लोकांच्याच हातात शिक्षणाची ताकद जाणार आहे. आम्हाला शिक्षण व्यवस्थेचं विकेंद्रीकरण पाहिजे ज्यामध्ये आपली संस्कृती दिसेल.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles